Benefits
आपल्याला माहित नसलेले (9) चालण्याचे फायदे । Benefits of Walking
नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी चालण्याचे फायदे काय आहेत हे घेऊन आलेलो आहोत. तसेच पायी चालण्याचे फायदे काय आहेत त्याचप्रमाणे चालण्याचे नियम काय आहेत हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो चालण्याचे फायदे हे खूपच आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया चालण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते.
अनुक्रमणिका
पायी चालण्याचे फायदे कोण कोणते आहेत ते आज आपण जाणून घेऊया
मित्रांनो पायी चालण्याचे फायदे आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण आणि आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी निरोगी आरोग्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया चालण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते.
1) चालल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो
मित्रांनो नेहमी चालल्यामुळे आपला रक्तदाब हा नेहमी नियंत्रित राहत असतो आपल्याला हाय ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही ब्लड प्रेशर नियंत्रित असणे आजकालच्या काळामध्ये खूपच महत्त्वाचे असते. कारण वाढलेल्या ब्लड प्रेशर मुळे हार्ट अटॅक पक्षाघात किडनी निकामी होण्याचा धोका हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो.
यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपण नेहमी चालण्याचा व्यायाम करणे आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. याशिवाय आपण चालल्यामुळे रक्तात वाढलेले व्हाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.
2) चालल्यामुळे झोप व्यवस्थित लागते
मित्रांनो नियमित चालल्यामुळे रात्री झोप चांगली होण्यास नेहमी मदत होते तसेच मानसिक ताण तणाव दूर होण्यास नेहमी मदत होत असते. आपल्या झोपेच्या तक्रारी असल्यास आपण दररोज सकाळी चालण्यास सुरुवात करावी यामुळे आपली झोप ही नक्कीच संध्याकाळी व्यवस्थित लागेल.
3) चालल्यामुळे डायबिटीस कमी होत असतो
मित्रांनो आपण सकाळच्या वेळेस चालल्यानंतर आपल्या रक्तातील साखर नियंत्रित होऊन मधुमेह आटोक्यात राहण्यास नेहमी मदत होत असते.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सकाळी चालणे हा एक चांगलाच व्यायाम प्रकार आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी मित्रांनो आपल्याला जर मधुमेह कमी करायचा असेल तर आपण सकाळी लवकरात लवकर चालण्याचा प्रयत्न करावा.
4) सकाळी चालल्यामुळे आपला रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो
मित्रांनो आपण जर सकाळी दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील हृदय मेंदू यांसारख्या सर्वच महत्त्वाच्या अवयवांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हा व्यवस्थितपणे होत असतो. यामुळे आपले शरीर हे निरोगी राहत असते.
5) सकाळी चालल्यामुळे आपले वजन आटोक्यात राहते
मित्रांनो नियमित चालल्यामुळे वजन कमी होण्यास नेहमी मदत होत असते तसेच शरीरातील चरबी कमी होण्यास देखील मदत होत असते. लठ्ठपणाची समस्या असल्यास आपण दररोज सकाळी चालण्याचा व्यायाम नक्की केला पाहिजे.
आपण जर सकाळी चालण्याचा व्यायाम करत असाल तर आपल्या शरीरामधील चरबी कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. तसेच शरीर मजबूत होण्यास देखील मदत होत असते.
6) चालल्यामुळे शरीर हे मजबूत होत असते
मित्रांनो आपण जर नेहमी चालण्याचा व्यायाम करत असाल तर आपले शरीर मधील असणाऱ्या मास पेशी हाडे व सांधे मजबूत होतात. त्यामुळे शारीरिक स्टॅमिना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो.
चालण्याचा व्यायाम काय आहे
मित्रांनो प्रत्येकाचे आयुष्य जर निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे आजकालच्या काळामध्ये खूपच गरजेचे झालेले आहे. व्यायाम अनेक प्रकारच्या असू शकतात. त्यामध्ये चालणे, पळणे, दोरी उड्या, मैदानी खेळ, जिना चढणे, सायकलिंग करणे, पोहणे, वजन उचलणे, अशा अनेक प्रकारचा व्यायाम असतो.
मित्रांनो सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम हा होय. दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण चालण्याचा व्यायाम करू शकता. तसेच चालण्याचा व्यायाम करण्यासाठी कोणतीही विशेष साधने आपल्याला खरेदी करावी लागत नाहीत. अगदी लहान मुले, गरोदर स्त्रिया तसेच वृद्ध व्यक्ती देखील हा चालण्याचा व्यायाम करू शकतात.
मित्रांनो चालणे हा सर्वांसाठी एक उत्तम असा असणारा व्यायाम आहे. आपण देखील चालण्याचा व्यायाम मित्रांनो लवकरात लवकर सुरू केला पाहिजे आपल्या निरोगी आयुष्यासाठी आणि निरोगी आपल्या शरीरासाठी.
आपण चालताना कोणती काळजी घ्यावी लागते
- चालताना आपण आरामदायक बूट घालावे.
- आपण अनवाणी चालवण्याचा व्यायाम करू नये.
- आपणास जर मधुमेह, सांधेदुखी, गुडघेदुखी, मणक्याचा त्रास असल्यास व्यायाम सुरु करण्यापूर्वी आपण डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
- मित्रांनो आपण चालणे आधी थोडे हळू व्यायाम करावे व त्यानंतर चालायला सुरुवात करावी.
- मित्रांनो आपण पंधरा मिनिटे भरभर चालून पुन्हा चालण्याचा वेग कमी करावा त्यानंतर पुन्हा हळूहळू आपण चालण्याचा वेग वाढवावा. असे केल्यामुळे चालण्याचा व्यवस्थित व्यायाम होऊन पाय गुडघे आणि हृदय यांच्यावर जास्त ताण येत नाही.
चालण्याचे नियम कोणकोणते आहेत
- मित्रांनो चालताना शरीराचा तोल सांभाळणे तसेच त्याचे योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये शरीरास अगदी सरळ परंतु आरामदायक परिस्थिती ठेवले पाहिजे खांदे आपण झुकू नयेत कधीही.
- मित्रांनो आपल्या शरीराचा पाया म्हणजे पाय असतात. त्यामुळे चालत असताना लक्षात घ्या की आपल्या पायाचे गुडघे आपल्या गुडग्यास अनुसरून असावेत. मान सरळ आणि सामान्य स्थितीमध्ये असावी. खांदे पाठीमागे असले पाहिजेत परंतु तेही आरामदायी स्थितीमध्ये असायला हवे याची आपण खबरदारी घ्यायला हवी.
- मित्रांनो हेल्दी वॉकिंग दरम्यान पायाच्या सर्व स्नायूंचा वापर होत असतो. अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण चालण्याची सुरुवात करतात. तेव्हा सर्वप्रथम आपण पुढच्या पायाची टाच ठेवा आणि संपूर्ण पाय जमिनीवर ठेवा.
- मित्रांनो चालताना आपले कोपर आपल्या शरीराच्या जवळ ठेवा आणि आपले हात फिरवा यामुळे आपल्या खांद्यांना तसेच मागच्या स्नायूंना नेहमी मजबुती मिळेल.
- मित्रांनो आपण चालताना वेगाने खूप लांब पावले टाकण्याचे टाळा दररोज सराव करा आणि तीस मिनिटांचा वेग वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करावे यासाठी काही वेगळे करण्याची गरज नाही दररोज काही वेळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा .
चालण्याचे फायदे याचा निष्कर्ष
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले चालण्याचे फायदे हे आपल्या आयुष्यामध्ये तसेच निरोगी शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. आपल्याला वरील दिलेले चालण्याचे फायदे हे नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला चालण्याचे फायदे यावरती अनेक तसेच काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही नेहमी नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो.
-
essay2 years ago
माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर, Maza Avadta Kalavant Lata Mangeshkar, माझा आवडता कलावंत लता मंगेशकर मराठी निबंध
-
essay2 years ago
झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh
-
essay2 years ago
मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words
-
essay2 years ago
मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi
-
essay2 years ago
माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध
-
essay2 years ago
माझे गाव मराठी निबंध । My Village Marathi Essay, माय व्हिलेज Essay
-
essay2 years ago
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध
-
Benefits3 years ago
काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]