Connect with us

essay

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

Published

on

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध: नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि मराठी निबंध जाणून घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे एक महान व्यक्तिमत्व आणि नायक मानले जातात. बाबासाहेब आंबेडकर हे लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संघर्ष केलेला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध 1000 words

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झालेला आहे. शाळेत व महाविद्यालयांमध्ये त्यांचा अनेक वेळा मानभंग झालेला होता. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले.

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तसेच कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयांमध्ये एम ए पी एचडी पदव्या मिळाल्या आणि त्यानंतर ते बॅरिस्टर देखील झाले.

मुंबईमधील सीडन हॅम महाविद्यालय मध्ये काही काळ ते प्राध्यापक देखील होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी विधी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम देखील केलेले आहे. नंतर काही वर्ष प्राचार्य पद देखील सांभाळलेले आहे.

नेहमी उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या वर्षानुवर्षी पिळवणुकीमध्ये दलित समाज हा भरडला जात होता. अशा असणाऱ्या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. शिकवा, चेतवा व संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य नेहमी होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या नेते समाजाची अस्मिता फुलवायची होती यासाठी ते मूक समाजाचे नायक झालेले होते. त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला वाचाल तर वाचाल.

वस्तीग्रह स्थापन करून मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे वाचनालय काढणे रात्रीच्या शाळा भरवणे तरुणांसाठी क्रीडा मंडळी चालवणे अशा कार्यावर बहिष्कृत हितकारणी सभेचा भर होता.

आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन करून मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयात व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय मध्ये या संस्था काढल्यावर खूपच मोठ्या नावा रुपास आणल्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध 500 words

दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड ला चवदार तळे येथे अहिंसक सत्याग्रह केला.

तसेच नाशिक मधील काळाराम मंदिरातील प्रवेश साठी देखील सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या प्रांताच्या विधिमंडळावर काम देखील केलेले आहे.

1942 मध्ये ते केंद्र सरकार मजूर मंत्री देखील होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेसाठी दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या स्वतंत्र घटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत.

दलितांचे मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्र मधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबवडे गावामध्ये झालेला होता. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे रामजी राव सतपाल हे सुभेदार म्हणून सैन्यांमध्ये होते बाबासाहेबांचे वडील हे अतिशय धार्मिक स्वभावाचे होते.

मुलांबरोबर बसून नेहमी पूजा पाठ करणे हे त्यांचे नित्यक्रम होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव भिमाबाई होते . भीमाबाई यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि गंभीर होता. भीमाबाई या नकली जीवनापासून पासून नेहमी दूर होत्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण

लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय खेळकर आणि खोडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासापेक्षा नेहमी खेळात जास्त रस होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच निर्भीड आणि जिद्दी होते. बाबासाहेब आंबेडकरांना विषमतेचे वातावरण हे त्यांच्या शाळेत व आजूबाजूला पाहायला मिळाले त्यामुळे ते अजूनच कणखर आणि निर्भय बनले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आणि नोकरी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1960 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली होती. 1912 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे पदवीधर झाले होते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी बडोदा संस्थांमधून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संघाचे सदस्य म्हणून अमेरिकेमध्ये गेले होते. तेथून त्यांनी एम ए आणि पीएचडी पदवी प्राप्त केली होती. बाबासाहेब आंबेडकर यांना लंडनमध्ये राहून त्यांनी डी एस सी ही पदवी मिळवायची होती.

परंतु शिष्यवृत्तीचा कालावधी संपल्यामुळे ते भारतात परतले. बडोद्याच्या राज्याला दिलेल्या वचनानुसार 1917 मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रियासत ची सेवा सुरू केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लष्करामध्ये सचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली परंतु तेथील काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांनी राजीनामा दिला. 1928 मध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीडनहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्राचे शिक्षक म्हणून काम सुरू केले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज आणि राष्ट्रासाठी योगदान

डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे एकच ध्येय होते. त्यांनी समाजासाठी खूपच काम केले समाजासाठी त्यांनी सर्वस्व सोडले. संघर्षाच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रचलित जातीव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही दिवसांमध्येच दलितांचे लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले होते. 1913 मध्ये त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दिली त्यांचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व केले होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली दलितांसाठी स्वतंत्र प्रतिनिधी तत्त्वाची मागणी सरकारने मान्य केली होती. हिंदू धर्मामध्ये असणारे प्रचलित असमानतेचे घटक संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला होता.

निष्कर्ष

मित्रांनो, निबंध स्पर्धेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यावरती मराठी निबंध बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. वरील प्रमाणे दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती निबंध आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यावरती दिलेला मराठी निबंध आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणताही निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच वरील प्रमाणे दिलेला निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending