Connect with us

essay

माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध

Published

on

माझी मायबोली मराठी निबंध

माझी मायबोली मराठी निबंध: मित्रांनो आपण माझी मायबोली याबद्दल मराठीमध्ये निबंध शोधत आहात तर आज आपला शोध या ठिकाणी संपणार आहे. कारण की आज आम्ही आपल्याला माझी मायबोली मराठीमध्ये निबंध देणार आहोत. मित्रांनो प्रत्येकाला आपली मातृभाषा ही नेहमी प्रिय असते.

किंबहुना त्याची आपल्या मातृभाषेची नाळ जोडलेली असते. तर मित्रांनो अशाच महाराष्ट्राची राज्यभाषा तसेच आपली मायबोली बद्दल आपण सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न करून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता माझी मायबोली मराठी मध्ये निबंध जाणून घेऊया.

माझी मायबोली मराठी निबंध 1000 शब्द

मित्रांनो, मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून ओळखली जाते. मित्रांनो महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी असली तरी तिचा विस्तार हा सातासमुद्र पलीकडे देखील झालेला आहे. मित्रांनो मराठीचा उगम हा संस्कृत भाषेपासून झालेला असावा असे देखील बोलले जाते. मित्रांनो माही भट्ट यांनी लिहिलेला लीला चरित्र हा मायबोली भाषेतील पहिला ग्रंथ आहे.

त्यानंतर मित्रांनो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हा मराठी भाषेमध्ये केला यानंतर रामदास स्वामींनी देखील दासबोध तसेच तुकारामाचे अभंग एकनाथांचे भारूड यांनी मायबोलीला खूपच चांगले स्वरूप दिले. तसेच यापुढे देखील मायबोली ही खूपच चांगल्या प्रकारे बदलत राहिली.

मित्रांनो, आजच्या काळामध्ये देखील प्रत्येक प्रदेश प्रांतानुसार मराठीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो कोकणामध्ये कोकणी, मालवणी ,विदर्भात बोराडे, कोल्हापुरात कोल्हापुरी गोव्यात कोकणी असे अनेक स्वरूप मध्ये बोलली जाते. मित्रांनो भाषेचे स्वरूप नेहमी वेगळे असले तरी गोडवा मात्र मायबोलीचाच आहे.

मराठी भाषा ही अतिशय लवचिक अशी असणारी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत तसेच एकाच अर्थाचे अनेक शब्द देखील आहेत .

यामुळे मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. मित्रांनो मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर बारा कोसावर बदलत असते. मित्रांनो लेखीभाषा जरी मराठी असली तरी बोली भाषेमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काही अंतरावर फरक जाणवत असतो.

मित्रांनो मराठीमध्ये अनेक पोटभाषा आहेत. त्यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक यामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. तसेच पूर्व खानदेशामध्ये खानदेशी भाषा बोलली जाते. विदर्भामध्ये वराडे किंवा विदर्भी भाषा बोलली जाते. कोकणात कोकणी तर गोव्यात कोकणी अशी भाषा बोलली जाते.

माझी मायबोली मराठी निबंध 500 शब्द

मित्रांनो, गंमत अशी आहे की भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासत असते. परंतु आपण कोल्हापूरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत आणि पोस्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी आहे.

तिथल्या स्त्रिया म्हणतात आम्ही आलो आम्ही जातो. आम्ही जातो साताऱ्याला भाषा थोडी नरम आहे होत असते. लवंगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या तंबाखूची गुंगी त्यात डोकावते तरी पण लई चिक्कार आईला वगैरे म्हणजे खास सातारी दंग कोकणात हीच मराठी अगदी मऊ असते.

मराठी भाषेचा उगम हा संस्कृत पासून झालेला आहे तर मराठी भाषेचे व्याकरण हे वाक्यरचना प्राकृत आणि पाली भाषेपासून तयार झालेले आहे. काळ बदलला तर मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे बदल होत असतात. मराठी भाषेमध्ये अरबी कानडी हिंदी इंग्रजी असे अनेक भाषेतले शब्द आलेले आहेत.

आज कालच्या काळामध्ये इंग्रजी भाषेला फार महत्त्व आलेले आहेत. यामध्ये आपण दोष कोणाला द्यायचा कारण महाविद्यालयांमध्ये तसेच उच्च शिक्षण सर्व इंग्रजीमधून होत असते.

तसेच पदवी मिळून तरुण मंडळी परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जात असतात. तिथे इंग्रजी भाषा बोलावी व लिहावी लागत असते. असो पण म्हणून आपण मातृभाषेला विसरून जायचे का हे देखील आपण आपल्या मनाला विचारले पाहिजे. परभाषा जरी अवगत झाली तरी आपण आपल्या मराठीला विसरून जाणे हे कदापि योग्य नाही.

प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता लिहिता वाचता आली पाहिजे हे देखील खूपच गरजेचे आहे. मराठीत सुद्धा खूपच विषयावर लेखन झालेले आहे. शास्त्र विज्ञान ललित साहित्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. आपल्या ज्ञानात वाढ करून घेतली पाहिजे म्हणून मराठी फक्त आपण बोलले नाही तर लिहून ही भाषा आणखी समृद्ध केली पाहिजे.

माझी मायबोली निबंध मराठीमध्ये याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, माझी मायबोली हा शाळा महाविद्यालय मध्ये तसेच विद्यालयांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निबंध विचारला गेलेला आहे. तसेच आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये देखील माझी मायबोली याबद्दल निबंध विचारला गेलेला आहे.

मित्रांनो आपल्याला माझी मायबोली मराठीमध्ये निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला माझी मायबोली याबद्दल दिलेला निबंध नक्कीच आवडलेला असेल. मित्रांनो, माझी मायबोली याबद्दल दिलेला निबंध आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापि विसरू नका.

Trending