माझा आवडता कलावंत मराठी निबंध: मित्रांनो आज आपण माझा आवडता कलावंत मराठी निबंध पाहणार आहोत. मित्रांनो निबंध लेखन स्पर्धेमध्ये माझा आवडता कलावंत हा निबंध खूपच वेळा विचारला गेलेला आहे. मित्रांनो आपल्या शाळेमधील तसेच महाविद्यालयामधील निबंध लेखन स्पर्धा ही खूपच महत्त्वाची अशी असणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला जर चांगले गुण मिळवायचे असतील तर हा निबंध आपल्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चला तर मित्रांनो मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर PDF

मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा दिसायला वेगवेगळ्या रूपामध्ये नेहमी असत असतो. त्याचा आवाज, त्याचा रंग, त्याचा चेहरा देखील खूपच वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या अंगी हा असल्यास छंद देखील खूपच वेगळा असतो .

कोणाला नृत्य करायला आवडते तर कोणाला वाचायला आवडत असते तर कोणी चित्रकला मध्ये खूपच अतिशय उत्कृष्ट असतो. मित्रांनो स्वतःच्या अंगी असलेल्या कलेचा वापर करून प्रत्येक व्यक्ती समाजासमोर नवीन काहीतरी मांडण्याचा नेहमी प्रयत्न करीत असते. काही लोक आपल्या कलेच्या साह्याने जगासमोर एक नवीन आदर्श देखील निर्माण करत असतात .

मित्रांनो, भारत देशामध्ये अनेक प्रकारचे कलाकार आहेत मित्रांनो सर्व कलाकारांमध्ये लता मंगेशकर यांनी मला सर्वाधिक असे आवाहन आणि भावुक केलेले आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या जादूने जगभरातील लाखो श्रोत्यांच्या हृदयावर राज्य केलेले आहे. लता मंगेशकर यांचा गोड आणि ताजा आवाज नेहमी प्रभावी असा आहे.

लता मंगेशकर यांचा जन्म हा 28 सप्टेंबर 1929 रोजी झालेला आहे. मध्य प्रदेश मधील इंदोर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांची थेटर कंपनी होती.

दीनानाथ मंगेशकर हे प्रतिष्ठित शास्त्रीय गायक देखील होते. लता मंगेशकर या आपल्या कुटुंबातील सर्वात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांच्या बहिणींची नावे आशा, उषा, मीना, आणि भावाचे नाव हृदयनाथ होते.

माझा आवडता कलावंत मराठी निबंध लेखन

लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांकडून गायनाचे धडे मिळत होते. लता मंगेशकर यांनी अली खान साहेब तसेच नंतर अमानत खान, तुलसीदास शर्मा यांच्याकडे देखील गायनाचे शिक्षण घेतले. लतादीदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

वडिलांचे निधन झाल्यानंतर नवयुग चित्रपट मूवी कंपनीचे मालक आणि मंगेशकर कुटुंबांचे सर्वात जवळचे मित्र मास्टर विनायक दामोदर यांनी लता मंगेशकर यांच्या कुटुंबाची काळजी घेतली.

तसेच लतादीदींनी गायिका म्हणून करिअर सुरू करण्यास सुरुवात केली. लतादीदींनी वयाच्या तेराव्या वर्षी पार्श्वगायिका म्हणून मराठी चित्रपटांमध्ये सर्वप्रथम प्रवेश केला.

1948 मध्ये मास्टर विनायक यांच्या निधनानंतर संगीत दिग्दर्शक गुलाम हायर यांनी लतादीदींना गायिका म्हणून नेहमी मार्गदर्शन केले. लतादीदींनी हळूहळू स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमावले.

लतादीदींच्या आवाजांमधून अनेक अभिनेत्रींनी देखील स्वतःसाठी मानाचे स्थान मिळवले. लतादीदींच्या मधुर आवाजाने अनेक गीतकार आणि संगीत दिग्दर्शकांना यश देखील मिळवून दिलेले आहे.

1962 मध्ये भारत चीन युद्धामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर लतादीदींनी एका मैफिलीमध्ये हे मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पाणी हे गाणे गायले होते. या गाण्याने भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील अश्रू अनावर झाले होते.

Essay माझा आवडता कलावंत मराठी निबंध

लतादीदींनी संपूर्ण भारतात आणि जगभरात संगीताला लोकप्रिय बनवण्यात दिलेले योगदान हे सर्वात मोठे आहे. लतादीदींनी आपले आयुष्य संगीतासाठी नेहमी समर्पित केले आहे.

लतादीदींना भारत देशामध्ये तसेच परदेशामध्ये अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तसेच त्यांचा सन्मान देखील परदेशामध्ये झालेला आहे.

मध्य प्रदेश मध्ये सरकारने लतादीदींच्या नावाने एक लाख रुपयांचा वार्षिक पुरस्कार देखील सुरू केलेला आहे. तसेच लतादीदींना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यामध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा देखील मिळालेला आहे.

लतादीदींनी संत तुकाराम महाराज यांनी रचलेली भक्ती गीते स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. तसेच भगवत गीतेची ध्वनिमुद्रण ही लतादीदींची अतुलनीय कामगिरी आहे. लतादीदी या भारताच्या सर्वोत्कृष्ट गायक आहेत.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेला निबंध आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो निबंध स्पर्धेमध्ये माझा आवडता कलावंत हा निबंध बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे.

मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला माझा आवडता कलावंत याबद्दल निबंध नक्कीच आवडलेला असेल.

मित्रांनो आपल्याला माझा आवडता कलावंत लता मंगेशकर यांच्या बद्दल आणखी काही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी ती माहिती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेला निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.