Connect with us

essay

मी आमदार झालो तर मराठी निबंध | Mi Amdar Zalo Tar Nibandh Marathi

Published

on

मी आमदार झालो तर मराठी निबंध

मी आमदार झालो तर मराठी निबंध: मित्रांनो आज आपण मी आमदार झालो तर मराठी निबंध पाहूया. मित्रांनो हा निबंध आपल्याला अनेक वेळा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे.

तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देखील हा निबंध विचारला गेलेला आहे. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मी आमदार झालो तर मराठी निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

मी आमदार झालो तर मराठी निबंध 1000 Words  Marathi Essay if i Become MLA

मित्रांनो, आमची दीडशे ते 200 घरांची वस्ती आहे. सर्व काही ठीक आहे परंतु पाणी आणण्यासाठी दोन ते तीन महिने आम्हाला पायपीट करावे लागत असते. शासनाच्या एका योजनेखाली आमच्या वस्तीसाठी नळ पाणी योजना मंजूर देखील झाली आहे. आणि आमच्या वस्तीचे वातावरण एकदम ढवळून निघालेले आहे.

आमच्या वस्तीत मध्ये अनेक गट तट पडलेले आहेत. भांडणे कुरकुरीत सुरू झालेले आहेत. एकमेकांवरचा विश्वास देखील उडालेला आहे.

तसेच काही लोक नळ पाणी योजनेसाठी आणलेल्या साहित्याची मोडतोड करू लागलेले आहेत. इंजिनीयर लोकांनी रोज नवनवीन कल्पना लोकांसमोर ठेवून भांडणे लावण्याचा पराक्रम रोज चाललेला आहे. आमच्या समितीच्या असणाऱ्या चार पदाधिकाऱ्यांना देखील गुंडांनी घरात घुसून मारलेले आहे.

पोलीस तक्रार लिहून घेत नाहीत आमदाराकडे गेलो तर ते लक्षात घालत नाहीत सगळेजण म्हणून लागले आहे की ठेकेदाराने सर्वांना खिशात घातलेले आहे तेच आमदार खासदारांना लाज देऊन गप्प बसवत असतात. काही दिवसांनी तर आम्हाला पैसे द्या नाहीतर ही योजना होऊ देणार नाही अशा धमक्या देखील येऊ लागलेले आहेत.

आणि सगळ्यांच्या तोंडाचे पाणी देखील पळालेले आहे. मी हे सर्व काही निमुटपणे पाहत होतो ही कसली लोकशाही लोकप्रतिनिधींनीच गुंडाना सामील झाले आहेत. की गुंडच राजकारणात आले आहेत सज्जन लोक राजकारणापासून लांब राहत आहेत.

म्हणूनच दुर्जनांनी राजकारण आपल्या ताब्यात देखील घेतलेला आहे. बाकी काही असो पण आता आपणच आमदार व्हायला हवे हा विचार माझ्या मनात सारखा घोळू लागलेला आहे .

मी आमदार झालो तर मराठी निबंध 500 words

मित्रांनो, मला आमदार पदासाठी पात्र होण्यासाठी अजून काही वर्ष लागणार आहेत. हे तर माझ्यासाठी खूपच चांगले आहे मला आमदार पदासाठी भरपूर तयारी देखील करता येईल.

आणि माझी योजना देखील तयारच आहे. सर्वात आधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका राज्य शासनाची असणारी कार्यालय या सर्वांच्या कार्यपद्धतीचा मी सविस्तर अशाप्रकारे अभ्यास करायला हवा. नागरिकांना या सर्व कार्यालयामधून कोणकोणत्या कामासाठी यावे लागते याची देखील मी यादी करणार आहे.

आणि प्रत्येक काम कशाप्रकारे केले जाते हे देखील समजावून घेणार आहे. सर्व कार्यालयातील असणारे व्यवहार ऑनलाइन करण्याचा आग्रह देखील धरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे नागरिकांची कोणत्या कामासाठी तसेच कोणत्या ठिकाणी अडवणूक होते हे देखील पाहता येणार आहे. तसेच यामुळे भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा यावर मोठ्या प्रमाणामध्ये जरब बसणार आहे.

वरील प्रमाणे सर्व कार्यपद्धतीची माहिती घेऊन झाल्यानंतर मी माझे काम थांबवणार नाही गावांमध्ये माहितीचा प्रसार करणार आहे. लोकांना कामकाजाच्या पद्धती समजतील आणि लोकांमध्ये जनजागृती होईल.

तसेच रास्तदाराची धान्य वाटप करणारी कार्यालय, पोलीस स्टेशन व हॉस्पिटल यामधील कार्यपद्धतीमध्ये देखील काटेकोरपणा आणण्यास भाग पाडेन.

लोकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी लोकांना सौजन्याची वागणूक देखील दिली पाहिजे. तसेच लोकांना कामाशिवाय थोडा वेळ सुद्धा थांबवून लागू नये याचा देखील प्रयत्न केला पाहिजे.

तसेच निर्धारित शुल्का पेक्षा एकही पैसा जास्त घेतला जात आता कामा नये यासाठी देखील मी योग्य तो प्रयत्न करणार आहे. आज शासनाच्या कल्याणकारी असणाऱ्या करून परंतु जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचत नाही म्हणूनच मी शासनाच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करणार आहे.

तसेच योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये काम करणार आहे. त्याचबरोबर शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना समाजकंटक आणि लोक सामान्य जनतेला योजनांपासून नेहमी दूर ठेवत असतात.

अशा अडथळे आणणाऱ्या लोकांना चाप लावण्याचे काम देखील विविध समित्यांमार्फत करणार आहे. जर आज समाजकंटकांवर चाप असता तर आमच्या असणाऱ्या नळ पाणी योजनेमध्ये घोटाळा झालाच नसता.

अशा अनेक बऱ्याच गोष्टी बदलता येतील पण मी ठरवलेले तेवढे तरी झाले तरी ते क्रांतिकारक काम ठरेल. मी तर माझ्या मनात निश्चित केले आहे की मी पूर्व तयारी एक आदर्श आमदार बनणार आहे.

निष्कर्ष

आपल्याला मी आमदार झालो तर मराठी निबंध हा अनेक परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारला जाण्याची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दाट शक्यता आहे.

मित्रांनो आपल्याला मी आमदार झालो तर याबद्दलचा दिलेला मराठी निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. मी आमदार झालो तर याबद्दल दिलेला मराठी निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending