Connect with us

essay

मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi

Published

on

मी कोण होणार मराठी निबंध

मी कोण होणार मराठी निबंध: लहानपणापासूनच आपण काही ना काही स्वप्ने पाहत असतो. प्रत्येकाची काही स्वप्न असतात ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो.

प्रत्येकाची आवड वेगवेगळी नेहमी असते पण भविष्यामध्ये माझे एक स्वप्न आहे आणि ते मला पूर्ण करायचे आहे. चला तर मित्रांनो आज आपण मी कोण होणार याबद्दल निबंध जाणून घेऊया.

प्रत्येकाची आवड वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक जण हा वेगवेगळे क्षेत्रांमध्ये काम करत असतो. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मी कोण होणार याबद्दल मराठी निबंध.

मी कोण होणार मराठी निबंध 1000 Words 

मित्रांनो, माझे एक स्वप्न आहे जे डॉक्टर बनून मला समाजाचे आणि देशाचे सेवा करायचे आहे. डॉक्टर बनून लोकांचे सेवा करणे हे माझे मोठे ध्येय आहे.

कोरोना काळामध्ये सर्व डॉक्टरांनी इतरांनी स्वतः मेहनत घेऊन आपल्याला सुरक्षित ठेवलेले आहे. असे करण्यासाठी खरोखरच ध्येय लागत असते. चला तर आज आपण डॉक्टर बनण्याचे महत्त्वाचे कारण आणि मी डॉक्टर का होणार आहे याबद्दल जाणून घेऊया.

डॉक्टर बनण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर हे खूपच मेहनत घेत असतात. डॉक्टर हा समाजाचा सर्वात मोठा असा असणारा सेवक आहे.

खरंच मित्रांनो मला डॉक्टर बनायचे आहे कारण डॉक्टर आपल्याला पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यात नेहमी मदत करत असतात.

डॉक्टर म्हणून मी गरिबांसाठी वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यास कडे लक्ष देण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे. लोकसेवेची ही सुवर्णसंधी मिळवण्याकरता मला डॉक्टर बनण्याचे खूपच माझे प्रयत्न आहेत.

डॉक्टर होणे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मला डॉक्टर बनून जे लोक आजारी आहेत त्या लोकांना उपचार करून बरे करायचे आहे.

डॉक्टर बनून निस्वार्थपणे लोकांचे सेवा करायचे आहे. आज आपल्या देशामध्ये काही आजारांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे परंतु काही आजारांचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.

आजकालच्या काळामध्ये खोकला ताप सर्दी डोकेदुखी अशा अनेक आजारांनी लोक नेहमी त्रस्त आहेत. मला डॉक्टर होऊन या रुग्णांवर उपचार करायचे आहेत.

मी कोण होणार मराठी निबंध 500 Words

मित्रांनो, मी डॉक्टर बनल्यानंतर आजारांनी हैराण असलेल्या लोकांना उपचार करून बरे करायचे आहे. याव्यतिरिक्तच मी अनेक लोकांना आजारापासून दूर कसे राहता येईल तसेच आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याची देखील माहिती देण्याचा खूपच सविस्तर प्रयत्न करणार आहे.

मी रुग्णांचे नीट तपासणी करेल आणि नंतर आवश्यक ती औषधे देखील देईल. गावामध्ये वैद्यकीय सुविधा फारच्या उपलब्ध नसतात परंतु स्वच्छता न ठेवल्याने अनेक आजार देखील जडत असतात.

तसेच मी लोकांवर उपचार करत असताना देखील लोकांना स्वच्छतेचे महत्व देखील पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी लोकांची सेवा करून जे योगदान दिले आहे.

त्याप्रमाणे मला शक्य होईल तेवढे लोकांच्या समस्या देखील दूर करण्यासाठी मला नेहमी प्रयत्नशील राहायचे आहे.

लोकांना अस्वच्छतेमुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याची माहिती देण्याचा नेहमी मी प्रयत्न करणार आहे. लोकांसाठी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ लोकांना नेहमी मिळण्यासाठी मी लोक प्रयत्न करणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला मी कोण होणार आहे याबद्दलचा मराठी निबंध हा अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये देखील परीक्षांमध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता आहे.

मित्रांनो आपल्याला मी कोण होणार याबद्दल दिलेला मराठी निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणताही निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो मी कोण होणार याबद्दल दिलेला मराठी निबंध आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending