Connect with us

essay

मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words

Published

on

मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध

मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध: मित्रांनो निबंध हा खूपच महत्त्वाचा असा असणारा शालेय जीवनामध्ये विषय आहे. आज आपण मी माझे मत विकणार नाही याबद्दलचा मराठी निबंध जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मी माझे मत विकणार नाही याबद्दल मराठी निबंध.

मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi

मित्रांनो, जगातील सर्वात मोठी लोकशाही असा असणारा राष्ट्र म्हणजे भारत देश आहे. मित्रांनो लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे निवडणूक प्रक्रिया तसेच मतदान प्रक्रिया.

मित्रांनो भारत हा जगाच्या पाठीवर एक असा राष्ट्र आहे ज्याने सर्वप्रथम जात, धर्म, गरीब, श्रीमंत असे सर्व मतभेद विसरून सरसकट वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. आजच्या काळामध्ये लोकशाहीचा विचार करता ही व्यवस्था पोकळ होत चाललेली चित्र आपल्याला दिसायला लागलेले आहे.

त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बदलत चाललेली मतदान प्रक्रिया. निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार हा जिंकून येण्याकरता गरज असते. एकूण झालेल्या मतदानापैकी फक्त एक अधिकच्या मताची आणि उमेदवार हा विजय होत असतो.

त्यामुळे तितकाच गणित करून जात धर्म इत्यादी नको त्या बाबींचे समीकरणे लावून बरेच राजकीय पक्ष उमेदवार आपल्या मतांची बेरीज ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात.

यासाठी ते साम-दाम-दंड-भेद अशा हवे त्या गोष्टीचा वापर करून निवडणूक निवडत असतात. वास्तविक ते भारत देशाच्या लोकशाही पद्धतीला चुकीचा प्रकार आहे.

म्हणूनच आपल्या लोकशाहीसाठी अतिशय घातक असा हा प्रकार आहे. काही वेळासाठी आपण समजून चालू की एक राजकीय पक्ष किंवा उमेदवार म्हणून निवडून येणे त्याला त्याच्या पहिला लक्ष असतो. आणि त्यासाठी तो आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात त्यामध्ये काही गैर देखील नाही.

मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी 500 words

परंतु आपण एक मतदार म्हणून जेव्हा विचार करत असतो त्या वेळा त्यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न पडत असतात. यामध्ये आपण आपले निवडणूक प्रक्रियेमध्ये आपले कर्तव्य काय तसेच आपली भूमिका काय त्याचप्रमाणे आपण करतोय काय आज आपण एका मताने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीते देशाचे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, सरपंच आणि शेवटी ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून येतात व विजय देखील ठरत असतात.

इतकेच नाही तर देशाच्या संसदेमध्ये फक्त एक मत कमी पडल्याने बहुमत सिद्ध न करू शकल्याने देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या प्रधानमंत्री पदावरून अटल बिहारी वाजपेयी यांना पायउतार व्हावे लागले इतकी ताकद एका मतात असते.

असे असून सुद्धा आज आपण फक्त पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काही शिल्लक 500 ते 1000 रुपयांसाठी नेहमी कुणाच्यातरी वेगळ्या दारू चिवड्यासाठी आपल्या अमूल्य मताची बोली लावत असतो.

उदाहरण झाले तर साधारण एक हजार रुपये मत प्रमाणे पाच वर्षाचा हिशोब केला तर प्रति दिवस एक रुपया पण धड आपल्याला मिळत नाही. तरी एकदा पैसे वापरायला मिळतील म्हणून बरेच लोक उमेदवाराकडून नेहमी पैसे घेत असतात. मग त्याच उमेदवाराकडून पाच वर्षे साहेब माझा हे काम करा म्हणून विनंती करत असतात.

साहेबांकडून अगोदरच पैसे खाल्ल्यावर का बरं साहेब आपले काम करतील इतका साधा प्रश्न देखील एक मतदार म्हणून आपल्याला समजत नाही. तसेच आपण स्वतःला विचारून देखील शकत नाही ही फार भारत देशांमधील असणाऱ्या लोकांचे शोकांतिका आहे.

Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi

मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी 300 words

तसेच दुसरीकडे स्वतःला सुशिक्षित सांगणारे लोक देखील मतदानासाठी मिळणाऱ्या सुट्टीचा गैरवापर करत असतात. त्यासाठी ते पर्यटन व आरामासाठी मतदानाच्या सुट्टीचा वापर करत असतात.

कितीही नाही म्हटलं तरी आपल्या भारत देशाची ही खरी वास्तव परिस्थिती आहे उमेदवाराची इच्छा नसताना देखील स्वतः मतदारांकडून पैशाच्या तसेच दारूच्या या गोष्टींची मागणी केली जाते. आणि मतदारांना दुखवायचे नसल्याने व आपले निवडून येणे लक्ष असल्याने उमेदवारांना या गोष्टीत देखील पडावे लागत असते.

या सर्व प्रक्रियेमधून निवडून येण्याआधीच त्याच्याकडून लाखो करोड रुपयांचा खर्च होत असतो. आणि तो निवडून आल्यानंतर तो खर्चाची भरपाई करण्यात या दृष्टीने प्रयत्न करत असतो. मग खरी लोकशाहीच्या दडपशाहीची सुरुवात होत असते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असे सांगतात की लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. स्वतःची मते विकणे म्हणजे स्वतःला विकण्यासारखे आहेत. ज्यामुळे ज्याने आपले बहुमूल्य मत विकले त्याला आपल्या सह आपल्या देशाचे पवित्र विकले असे म्हणता येईल.

त्यामुळे आता इथून पुढे स्वतःला देशाला विकायचे नसेल तर कोणतेही प्रलोभनाला बळी न पडता आपण आपले मत विकणार नाही असा संकल्प करत स्वतंत्र मतदान करण्याची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागेल. मतदान करणे फक्त अधिकार न राहता आपले कर्तव्य आहे. असे आपण सर्वजणांनी समजले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये लोकशाही नांदेल.

मी माझे मत विकणार नाही याबद्दल काही महत्त्वपूर्ण ओळी

  • हरलो जरी मी आज,
  • मत माझे विकणार नाही,
  • कारण माझे मत विकले गेल्याने,
  • देशातील लोकशाही टिकणार देखील नाही,
  • यामुळे मी माझे मत विकणार नाही,

Trending