Connect with us

essay

पेट्रोल संपले तर मराठी निबंध । Petrol Sample Tar Marathi Nibandh, जगातील पेट्रोल संपले तर

Published

on

पेट्रोल संपले तर मराठी निबंध

पेट्रोल संपले तर मराठी निबंध: मित्रांनो, आज आपण पेट्रोल संपले तर या विषयावर मराठी निबंध जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजकाल पेट्रोलचे दर हे खूपच चर्चेत आहेत.

कारण पेट्रोलचे भाव हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. मित्रांनो आपण एक दिवस पेट्रोल संपले तर असा विचार केला आहे का चला तर मित्रांनो आज आपण निबंध जाणून घेऊया.

पेट्रोल संपले तर मराठी निबंध 500 शब्दांमध्ये

मित्रांनो, पृथ्वीवर ऊर्जेचे वेगवेगळे स्रोत अस्तित्वात आहेत तसेच यामध्ये काही स्रोत हे पारंपारिक तर काही अपारंपारिक आहेत. मित्रांनो पारंपारिक स्रोतांमध्ये कोळसा, पेट्रोल, डिझेल इत्यादींचा समावेश होत असतो. तर सूर्यप्रकाश, हवा, बायोमास असे ऊर्जेचे अपारंपारिक स्रोत आहेत.

या सर्व स्रोतांमध्ये महत्त्वाचे नैसर्गिक खनिज म्हणजे पेट्रोल आणि डिझेल आहे. कारण मित्रांनो यांच्यामुळेच आपली वाहने ही चालवण्यास मदत मिळत असते.

पेट्रोल डिझेल शिवाय वाहने चालवणे शक्य नाही. मित्रांनो मनुष्य हा शेकडे वर्षापासून पेट्रोल डिझेलचा वापर करीत आलेला आहे. परंतु मित्रांनो पेट्रोल हे पारंपारिक ऊर्जा स्रोत असल्यामुळे येत्या काळामध्ये ते संपुष्टात देखील येईल.

मित्रांनो पेट्रोल संपले तर आपले काय होईल तसेच आपली वाहने कशी चालणार तसेच आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी कसे जाणार याचा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला असेल चला तर जाणून घेऊया याबद्दल.

शास्त्रज्ञांच्यानुसार 2080 पर्यंत जगामध्ये असणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा हा पूर्णपणे बंद होणार आहे. मित्रांनो मानवी जीवनाचा पेट्रोल हे आज एक महत्त्वपूर्ण असे भाग बनलेले आहे.

तसेच पेट्रोल शिवाय सरळ जीवनाची कल्पना करणे देखील कठीण होत चाललेले आहे. मित्रांनो पेट्रोल हे पारंपारिक स्रोत असल्यामुळे येत्या काळामध्ये ते संपुष्टात देखील येणार आहेत.

पेट्रोल संपल्यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था घालवणार आहे. मित्रांनो आजकाल जगातील सर्वाधिक प्रवास एका देशातून दुसरे देशांमध्ये वस्तूंची देवाण-घेवाण ट्रक, रेल्वे, विमान जहाज इत्यादी वाहतुकीच्या साधनांद्वारे केली जात आहे.

परंतु पेट्रोल आणि डिझेल संपल्याने ही सर्व वाहने चालणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही देशातून आयात निर्यात करणे शक्य होणार नाही परिणामी विदेशी व्यापार ठप्प होणार आहे.

पेट्रोल संपले तर मराठी निबंध 300 शब्दांमध्ये

मित्रांनो, पृथ्वीच्या गर्भातील पेट्रोल डिझेल सर्व खनिज तेल संपले तर आपण पुन्हा एकदा प्राचीन काळामध्ये जाऊ आपल्या प्रवासासाठी मोटर वाहनांच्या ऐवजी बैलगाडीने घोडा गाडीचा वापर करावा लागेल.

ज्या लोकांना वेगवान गतीची गाडी परवडत असतील तसेच एका ठिकाणावर दुसरीकडे जाण्याची सवय असेल त्यांना तर आपली सवय कायमचीच विचारावी लागेल. पेट्रोल डिझेल संपल्यानंतर आपल्यासमोर अनेक समस्या उभ्या राहणार आहेत. म्हणजे या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आज आपण प्रयत्न करणे खूपच आवश्यक आहे.

यासाठी जास्तीत जास्त विद्युत वाहनांच्या वापरावर आपण भर द्यायला हवी. तसेच शासनासोबत देशातील प्रत्येक नागरिकांनी देखील आपली जबाबदारी समजायला हवी.

खाजगी वाहन वापरण्याऐवजी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा उपयोग करायला हवा. असे केल्याने देशातील प्रदूषणाचे समस्या देखील कमी होत असते.

याशिवाय सौर ऊर्जेवर चालणारे अनेक दुचाकी व चारचाकी वाहने बाजारात देखील उपलब्ध आहेत. पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने न घेता या विद्युत ते वाहनांना प्रधान्य द्यायला हवे जर अशा पद्धतीने प्रत्येक जण आपली जबाबदारी समजून प्रयत्न करेल तर पेट्रोल संपल्यावर निर्माण होणारे दुष्परिणाम देखील टाळता येतील व निसर्गाला ही प्रदूषण मुक्त करता येईल.

पेट्रोल संपले तर निबंध 200 Words मध्ये

मित्रांनो, मानव आणि निसर्गाचा खूपच महत्त्वाचा असा घटक असणारा प्राणी आहे. मित्रांनो निसर्गाने मानवाची जशी निर्मिती केली त्याच पद्धतीने मानवाच्या मूलभूत गरजा देखील निसर्गाने पूर्ण केलेले आहे.

हवा, पाणी सूर्यप्रकाश या अमर्यादित स्रोतन पासून तर खनिज तेल, लाकूड असा नैसर्गिक साधनसंपत्ती निसर्गाने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये दिलेला आहे. या नैसर्गिक साधन संपत्ती पैकी पेट्रोल हे एक महत्त्वाचे असे असणारे इंधन आहे.
आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये मानवाच्या जीवनाची गतीही पेट्रोल ने दिलेली एक वरदानच आहे.

पेट्रोल मुळे मानवाची अनेक कामे सोपी झालेली आहेत. मित्रांनो आज प्रत्येक घरामध्ये कमीत कमी एक तरी वाहन आपल्याला पाहायला मिळत असते.

परंतु मित्रांनो दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाढणारे वाहनांचे प्रमाण यामुळे अशा मर्यादित खनिज तेलांचे प्रमाण देखील कमी होत चाललेले आहेत. पृथ्वीवरील इंधनाचा साठा देखील संपत चाललेला आहे.
मित्रांनो पेट्रोल संपले तर दळणवळणाची प्रक्रिया पूर्णपणे थांबणार आहे.

मोटारी स्कूटर यांसारखे पेट्रोलवर अवलंबून असणारी वाहने जागी थांबणार आहेत. एका गावांमधून दुसऱ्या गावामध्ये जाणारा प्रवास हा कमी होणार आहे. गतिरोधकामुळे वाहनांना जसा ब्रेक लावावा लागत असतो तसाच ब्रेक पेट्रोल संपल्यावर आपल्या वाहनांना लावा लागणार आहे.

पेट्रोल संपल्याने इंधनावर अवलंबून असणारे सर्वच व्यापार आहे संपुष्टात येणार आहेत. तसेच आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याचा परिणाम देखील भारतीय अर्थव्यवस्थेवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे.

देशांमध्ये आयात निर्यात बंद होणार आहे. ज्या ठिकाणी जे पीक पिकत असेल त्या त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते पीक पोहोचवणे अशक्य होणार आहे. परकीय चलन बंद होणार आहे. वाहतुकीसाठी घोडा गाडी बैलगाडी सायकल याचा वापर करावा लागणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, पेट्रोल संपले तर मराठी निबंध हा निबंध आपल्याला नक्कीच आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो पेट्रोल संपले तर मराठी निबंध हा अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला निबंध आहे.

तसेच येणाऱ्या काळामध्ये देखील पेट्रोल संपले तर हा मराठी निबंध विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो आपल्याला पेट्रोल संपले तर याबद्दलचा मराठी निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणताही निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो पेट्रोल संपले तर याबद्दलचा मराठी निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत तसेच कुटुंबापर्यंत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending