Connect with us

essay

स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध । Swatantra Ani Lahan Thoranche Balidan Marathi Essay

Published

on

स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध

स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध: मित्रांनो नमस्कार आज आपण स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट या आपल्या भारतीय सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारतासाठी एक सणच आहे. मित्रांनो शाळा आणि कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या क्रांतिकारी आणि समाज सुधारक यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याची महती सर्वांना सांगितली जाते. चला तर मग जाणून घेऊया स्वतंत्र आणि लहान थोरांचे बलिदान याविषयी मराठी निबंध.

स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध PDF

15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते आणि यानंतर राष्ट्रगीत गायले जाते यानंतर भाषणांचा कार्यक्रम होत असतो. आपल्या स्वतंत्र भारत राष्ट्राबद्दल आणि मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल इंग्रजी राजवट तसेच अन्याय क्रांतीकारांची धाडस साहस इत्यादींचे किस्से देखील या दिवशी सांगितले जातात. ही खरच आपल्या भारत देशासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे.

प्रत्येकाला आपल्या मनामध्ये एक प्रेरणा आणि आत्मविश्वास चेतना जागृत होत असते. भारत देशामधील प्रत्येकाला देश प्रेमाची भावना तसेच राष्ट्रीय एकात्मता ही होत असते. तसेच भारत देशामध्ये सर्वधर्मसमभाव याचा देखील खूपच मोठ्या पद्धतीमध्ये प्रत्यय येत असतो.

मित्रांनो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले दोन राष्ट्रीय खूपच मोठे सण आहेत. मित्रांनो या दिवशी सरकारी कार्यालय शाळा कॉलेज वगैरे ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम हा होत असतो.

राजधानी दिल्ली येथे लष्करांचे मोठे संचालन देखील असते. या दिवशी 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी या दिवशी शाळांमध्ये ध्वजवंदन यासाठी प्रमुख पाहुणे देखील बोलावले जातात. पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी झेंडा गगनात फडकवला जातो. नंतर ध्वजाला वंदन करून एक सुरात राष्ट्रगीत देखील आपण म्हणतो.

या यानंतर देशभक्तीपर गाणी म्हणत बँड च्या तालावर भव्य मिरवणूक देखील काढली जाते. आपल्या तिरंगी ध्वजामध्ये वरचा पट्टा हा केसरी असतो. तसेच मधला पट्टा पांढरा रंगाचा व सर्वात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असतो.

भारतीय ध्वज हा सुख समाधान व शांती या गोष्टीचे प्रतीक मानले जाते. भारत देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या तिरंगी ध्वजाचा मान ठेवला पाहिजे. प्रत्येकाने राष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहून आपल्या राष्ट्रध्वज डोलाने फडकवत ठेवला पाहिजे.

स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध 200 words

15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो. 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवून आपला तिरंगी झेंडा सगळीकडे लहरू लागला.

आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक नेत्यांनी बलिदान देखील दिलेले आहे. 15 ऑगस्ट हा दिवस आपण सगळ्यांची आठवण काढत आनंदाने साजरा करतो.

15 ऑगस्ट दिवशीच्या सगळी सरकारी कार्यालय शाळा सरकारी कचेरी सजवल्या जातात. सकाळी लवकर झेंडावंदन केले जाते. शाळेमध्ये जमून शाळेमध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कवायत केली जाते.

आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यासाठी झालेली चळवळ ही अखेरीस आपली यशस्वी झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले.

भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका झाला याचा आनंद सर्व देशभर साजरा केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राण्यांचे आहुती देखील दिलेली आहे तसेच देशासाठी प्राण देखील गमावलेला आहे.

भारताचे स्वातंत्र्य याबद्दल खालीलप्रमाणे गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे

1) 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रगीत अस्तित्वात नव्हते. जनगणमन हे बंगालीमध्ये 1911 मध्येच रचले गेलेले होते तरीसुद्धा 1950 पर्यंत राष्ट्रगीत म्हणून याला मान्यता मिळालेली नव्हती.

2) माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट या तारखेची निवड केली. कारण याच दिवशी नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया ब्रह्मदेश हे स्वतंत्र झाले होते. म्हणूनच सर्व देशांच्या बरोबर भारताचा देखील 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र दिन असतो.

3) भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगालने आपल्या संविधानामध्ये सुधारणा करून गोवा हे पोर्तुगीज राज्य म्हणून घोषित केले. 19 डिसेंबर 1961 मध्ये भारतीय सैन्याने गोव्यावर आक्रमण करून गोव्याला भारतामध्ये विलीन केले.

4) भारत देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 562 संस्थाने भारतामध्ये स्थापन झाली.

5) बाळ गंगाधर टिळक यांनी सर रतनजी टाटा यांच्यासमवेत स्वदेशी मालाचे सहकारी स्टोर स्थापन केले .

6) १९४७ मध्ये जम्मू काश्मीर वर आक्रमण केले.

7) भगतसिंह हे पाच भाषा अचूक बोलत होते.

8) ध्वज हा खादीच्या कापडाने बनलेला असावा.

निष्कर्ष

मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध या बद्दल दिलेली माहिती खूपच उपयोगी पडणार आहे .

मित्रांनो स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध या बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण कंमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या आणखी कोणताही निबंध हवा असल्यास आपण तो कंमेंट मध्ये नक्की सांगा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending