Connect with us

essay

झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh

Published

on

झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध

झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध: मित्रांनो आपल्या जीवनामध्ये झाडांचे महत्त्व हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो झाडांमुळे आपण आज जिवंत आहोत. मित्रांनो झाडांचे अनेक उपयोग आपल्या जीवनासाठी खूपच महत्त्वाचे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तसेच मित्रांनो झाडांमुळे देश आपला कसा वाचेल याची देखील माहिती आज आपण या निबंधद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध.

झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध 1000 Words

मित्रांनो, मनुष्य आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे आपल्याला आजूबाजूला असणारी झाडे ही नेहमी निसर्गाची शोभा वाढवत असतात.

आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष देखील वातावरणातील असणारे कार्बन-डाय-ऑक्साइड देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेत असतात.

आपल्याला असणाऱ्या जीवन आवश्यक असलेला ऑक्सिजन देखील झाडे आपल्याला प्रदान करत असतात. तसेच वातावरणामधील असणारे हवा शुद्ध करण्याचे काम देखील वृक्ष करत असतात.

आपल्याला अनेक आजारांपासून देखील झाडे सुरक्षित ठेवत असतात. झाडे नेहमी पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत असतात.

ज्या भागात वृक्षांची संख्या जास्त आहे तिथे पाऊस नेहमी जास्त पडत असतो. मित्रांनो औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांपासून आपल्याला वेगवेगळ्या आजारावर औषधे नेहमी उपलब्ध होत असतात. निसर्ग मधून आपल्याला असंख्य गोष्टी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतात आपण पर्यावरणाची देखील काळजी घेतली पाहिजे.

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या ही कमी होत चालले आहे हे निसर्गचक्र व्यवस्थित चालवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढवणे खूपच गरजेचे आहे.

जागतिक तापमान वाढ प्रदूषण पाऊस कमी पडणे तसेच अनेक समस्या आपल्यासमोर उभे राहत आहेत. पाऊस न पडल्यामुळे आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावे लागत आहे.

हवेमधील असणाऱ्या विषारी वायूमुळे शोषणाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना देखील तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्येचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपण आपल्या पर्यावरणाची नेहमी काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.

झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध 500 words

मित्रांनो, आपल्याला जर पर्यावरण संतुलन व्यवस्थित ठेवायचे असेल तर वृक्षारोपण करणे खूपच गरजेचे झालेले आहेत. वृक्षांची संख्या वाढवणे हे खूपच आजकालच्या काळामध्ये महत्त्वाचे ठरलेले आहे.

वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. त्याचमुळे बरेच आजार देखील वाढत चाललेले आहेत. श्वास घेण्यास शुद्ध ऑक्सिजन देखील आजकालच्या काळामध्ये मिळत नाही.

वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच गरजेचे ते लावलेले वृक्ष जपणे व त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. पाणी अभावी अनेक झाडे सुकून जात आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचे पालन पोषण सुद्धा करावे लागणे खूपच गरजेचे आहे.

मित्रांनो, आपल्याला निसर्गचक्र हे असेच व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या घराजवळ नेहमी तसेच रस्त्याच्या कडेला आपल्याला शक्य होईल तितकी झाडे आपण लावली पाहिजेत.

वृक्ष संवर्धनासाठी अनेक अभियान देखील राबविण्यात येत असतात. एखादी गोष्ट लोकसहभागातून पूर्ण होत असते त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजेत. शाळांमध्ये कॉलेजमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील आयोजित केले पाहिजेत.

तसेच लहान मुलांना वृक्षाचे महत्व देखील समजावले पाहिजे. प्रत्येकाला निसर्गरम्य ठिकाणी भेट द्यायला नेहमी आवडत असते. आपण त्या ठिकाणी एखादे झाड लावून तेथील सुंदरते मध्ये आणखी भर घालू शकता.

जागतिक तापमान वाढ अशा परिस्थितीत आपल्याला झाडे लावणे खूपच महत्त्वाचे आहेत. झाडे लावा झाडे जगवा असे आपण अनेक ठिकाणी ऐकले असेलच आपण जर आजपासूनच वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन केले नाही तर सर्वांचे अस्तित्व देखील धोक्यामध्ये येणार आहे. झाडे लावा देश वाचवा ही टॅगलाईन खूपच महत्त्वाचे आहे.

मित्रांनो, आपण प्रत्येकाने जर एक झाड लावले तरी आपला निसर्ग हा हिरवागार होऊ शकतो. आपल्या पुढच्या पिढीला उज्वल भवितव्यासाठी एक तरी आपण झाड लावले पाहिजे.

वृक्षारोपण करणे व त्याचे संरक्षण करणे ही आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडांचे महत्त्व समजून घेणे आपण वृक्षारोपणासाठी इतरांना प्रेरित देखील केले पाहिजे.

आपण लावलेली झाडे आपल्याला फळे फुले देतील व आपल्यालाही सावली देखील प्रदान करत असतील. तसेच आपल्याला पुढील पिढीला देखील स्वच्छ वातावरण देखील देत असतील.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेला निबंध झाडे लावा देश वाचवा याबद्दलचा नक्कीच आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला झाडे लावा देश वाचवा याबद्दल दिलेला मराठी निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणताही प्रकारचा निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेला झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध आपण आपल्या कुटुंबापर्यंत तसेच मित्र परिवारात सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending