Connect with us

essay

मी मताधिकार बजावणार कारण मराठी निबंध | मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क, मतदान नव्हे मताधिकार

Published

on

मी मताधिकार बजावणार कारण मराठी निबंध

मी मताधिकार बजावणार कारण मराठी निबंध: मित्रांनो आज आपण मतदानाचा अधिकार याविषयी निबंध पाहणार आहोत. मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की हा निबंध आपल्याला खूपच आवडणार आहे. मित्रांनो आपण भारतीय नागरिक असल्याने राज्यघटनेने आपल्याला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे हा अधिकार आपण बजवायला हवा हे खूपच महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्या देशासाठी.

मी मताधिकार बजावणार कारण मराठी निबंध PDF

मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे. परंतु मित्रांनो देशातील 40 टक्के लोकांना असे वाटते की मतदानाच्या दिवशी सुट्टी असेल तर या सुट्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे. आपलं एक मत नसेल तर काय फरक पडणार आहे असे काही लोकांना वाटत असते.

तसेच किंवा मतदान केल्यास यामध्ये आणखी काय बदल होणार आहे हे देखील काही लोकांना वाटत असते. आज आपल्या भारत देशामध्ये सरासरी फक्त 50 ते 70 टक्के मतदान होत असते. यामध्ये लहान मोठे राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होत असते.

मित्रांनो ज्या उमेदवाराला दहा ते पंचवीस टक्के मते मिळाली आहेत तो उमेदवार हा विजय होत असतो. म्हणूनच आजकालचे नेते हे दहा ते पंचवीस टक्के लोकांनाच आपल्या प्रभावाने दारू पाजून पैसे वाटून मतदान करून घेतात.

आणि निवडणूक जिंकून येत असतात. त्यामुळे असे लोक येतात जे पूर्णत आहेत त्यांना निवडून देत असतात म्हणून देशांमध्ये भ्रष्टाचार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे.

भ्रष्ट नेत्यांचा एकच उद्देश असतो निवडणूक जिंकायचा आणि एकमेव उद्देश सत्ता मिळवणे तसेच या सत्तेमधून पैसा कमवणे हाच उद्देश होत असतो. निवडणूक जिंकल्यानंतर पुढची पाच वर्षे देशाच्या साधन संपत्तीचा प्रचंड गैरवापर हे भ्रष्ट लोक करत असतात.

तसेच खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार देखील करत असतात. मित्रांनो आपल्याला जर सध्याची भ्रष्ट व्यवस्था बदलायची असेल तर आपण जनतेने सर्वांनी मिळून मतदान केले पाहिजे. मित्रांनो आपल्या देशामध्ये जी भ्रष्ट व्यवस्था सुरू आहे. आणि सर्वत्र याचे वातावरण पसरलेले आहेत तेच आपण मतदान न करण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

मी मताधिकार बजावणार कारण मराठी निबंध 1000 words

मित्रांनो, निवडणुकीत जर सर्व लोकांनी मतदान केले तर तेच लोकसत्तेवर येतील जे देशासाठी आणि सामान्य जनतेसाठी काम करत असतील. त्यामुळे मित्रांनो अशा लोकांना बाहेर पडून मतदान करावे लागेल जे एक तर राजकारणापासून दूर आहेत.

कारण ते सध्याच्या राजकारणापासून पूर्णपणे निराश झालेले आहेत आणि त्यांचे मन असे म्हणत आहे की आता काहीही होणार नाही असे गृहीत धरून ते आहेत.

मित्रांनो तुम्ही आणि तुमच्यासारखे जागरूक लोक भ्रष्टाचार आणि अप्रमानिक लोकांना पुन्हा निवडून येऊ नये म्हणून त्यांना समजावून मतदान करण्यास प्रवृत्त करावे असा विचार करणारे बहुतेक लोक सुशिक्षित वर्गात मोडत असतात.

जे मित्रांनो कमी शिकलेले आहेत त्यांना पैसे देऊन कुठलाही पक्ष मत विकत घेत असतो. मग ज्यांना मते मिळायला हवेत त्यांना मते मिळत नाहीत मतदान हा आपला मित्रांनो हक्क आहे आणि आपली जबाबदारी देखील आहे. मित्रांनो प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. गणना नाही एकापासून सुरू होते आणि लाखो पर्यंत पोहोचत असते.

मित्रांनो आपण घरी बसून नेहमी काही गोष्टी सांगत असतो की सरकारने हे केले नाही ते केले पण मतदान केले नाही तर कुठेतरी ह्यालाच आपणच जबाबदार असतो.

हे देखील आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच आपला नेता निवडण्यासाठी आपण मतदान करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय देखील नाही म्हणूनच आपण मतदान करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. मित्रांनो मतदान का करावे यामागे अनेक प्रकारचे पैलू देखील आहेत हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

मी मताधिकार बजावणार कारण मराठी निबंध

मतदान का करावे यामागे असणारे अनेक महत्त्वाचे पैलू

मित्रांनो, आपल्या देशाचा पैशाचा योग्य वापर व्हावा असे आपल्याला जर वाटत असेल तर आपण योग्य नेता निवडणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिले आहे की मित्रांनो जेव्हा जेव्हा एखाद्या प्रांताला चांगले नेते मिळतात तेव्हा तो प्रांत किती वेगाने विकसित होत असतो. कोण बरोबर आणि कोणचे सुशिक्षित वर्गात येणाऱ्या प्रत्येकालाच माहीत असते.

मित्रांनो, संघटित होऊन आपण सर्वजण योग्य नेता निवडून आपण आपल्या देशाच्या पैशाचा गैरवापर होण्यापासून वाचवू शकतो.

तसेच सरकारला दिलेल्या कराच्या पैशाच्या बदल्यात आपल्याला हवे असलेल्या सुविधांसाठी देखील मतदान आपण करावे लागते.

मित्रांनो, आपण मतदान करून आपली जबाबदारी पार पाडू शकतो तरच सरकार आपल्यासाठी काम करत असते अशी अपेक्षा आपण करू शकतो.

सबका साथ आणि सबका विकास तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या जबाबदारी पासून दूर जात नाही हे देखील लक्षात घेणे खूपच गरजेचे आहे मित्रांनो.

मित्रांनो, आपला भारत देश हा खूप मोठा देश आहे. एवढे मोठे देशांमध्ये काही समस्या असणारच पण हा विचार करून आपण जर मतदान केले नाही तर आपला भारत देश सुधारण्याचे अपेक्षा करण्यात देखील आपल्याला अर्थ नाही त्यासाठी आपण मतदाना आवश्यक आहे ते काम आपण केले पाहिजे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विकला जाऊ नकोस त्यामुळे तुमचे एक मत देखील खूप महत्त्वाचे आहे हेच मत आपण विकले जाणार नाही याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.

मत कोठेही विकले जाणार नाही याविषयी आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करणे खूपच गरजेचे आहे. जनजागृतीसाठी आपण आपल्याकडे जो विषय ठरलेला आहे त्या विषयाचा माहितीचा स्रोत असतो तो माहितीसाठी आपल्याकडे असणे देखील खूपच गरजेचे आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला मी मताधिकारक बजावणार कारण मराठी निबंध याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेला निबंध आपल्याला खूपच उपयोगी येणार आहे. मित्रांनो आणखी कोणतेही प्रकारचा आपल्याला निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेल्या निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending