Connect with us

essay

मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण मराठी निबंध । Safety and Empowerment of Girls Marathi Essay

Published

on

मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण मराठी निबंध

मित्रांनो, आज आपण मुलींची सुरक्षा तसेच सक्षमीकरण याबद्दल निबंध जाणून घेणार आहोत. मित्रांनो कोणतेही वर्तमानपत्र आज आपण कोणत्याही दिवशी त्यामध्ये मुलींवर विविध प्रकारच्या अत्याचार झालेल्या बातम्या आपल्याला नेहमी पाहायला मिळतात.

आज आपण मुलींची सुरक्षा आणि त्यांचे सशक्तिकरण हे मुद्दे पाहणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया मुलींची सुरक्षा तसेच सशक्तिकरण याबद्दल मराठी निबंध.

मुलींची सुरक्षा व सशक्तिकरण मराठी निबंध 500 शब्दांमध्ये

मित्रांनो, मुलींची सुरक्षितता वाढवण्यासाठी मुलींना केवळ कायदेशीर रित्या संरक्षण देऊन चालणार नाही. कारण आज भारत देशामध्ये मुलींच्या संरक्षणासाठी कायद्यांची कमी नाहीत.

त्यामुळे त्यांचे सक्षमीकरण करत असताना त्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक दृष्टीने देखील त्यांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.

मुलींच्या सुरक्षेची गरज त्यांच्या पोटामध्ये असल्यापासूनच सुरू होत असते आपला जर वंश चालवण्यासाठी मुलगा हा कुलदीपक ठरत असला तर परंतु मुलीला ते मानाचे स्थान दिले जात नाही.

वंश चालवण्यासाठी मुलगाच पाहिजे हा दुराग्रह कमी होण्यासाठी समाजाच्या प्रबोधनाची आजही तितकीच मोठी भारत देशाला गरज आहे.

तसेच भारत देशामध्ये मुलींची गर्भातच होणारे हत्या ही फार गंभीर समस्या बनलेली आहे. तसेच मित्रांनो स्त्री जन्माचे स्वागत करून ही भूमिका प्रत्येक कुटुंबामध्ये घेतली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे समाजातील सर्व क्षेत्रामधील नेतृत्वाने यावर निश्चित भूमिका घेऊन संघर्ष करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मित्रांनो, मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या जन्माचे स्वागत हे अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेले परंतु सर्वच घरांमध्ये ही गोष्ट पोचलेली नाही.

भारत सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने मुलींना विविध प्रकारे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवले आहेत.

आर्थिक दृष्ट्या होणारी महिलांची पिळवणूक ही एक शोकांतिका बनवून राहिलेले आहे. मित्रांनो महाराष्ट्र मध्ये मुलीला संपत्ती मध्ये समान वाटा देणारा कायदा देखील तयार झालेला आहे.

तरीही विविध प्रकारे मानसिक छळ करून त्यात मुलींचा हक्क आजही नकारला जात आहे. यासाठी मुलींना संरक्षण मिळणे खूपच गरजेचे झालेले आहे.

आजकालच्या काळामध्ये मुलीला शारीरिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले पाहिजे. तसेच त्यांचे कुपोषण होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न करण्याची देखील गरज आहे.

शालेय वयामध्येच मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यासाठी जुदो कराटे यांसारखे शिक्षण देण्यासाठीची योजना सक्तीने राबवली गेली पाहिजे.

याबाबत गंभीरपणे काम करण्याचे नितांत महाराष्ट्र मध्ये आणि भारत देशामध्ये गरज आहे. तसेच मुलींना किंवा महिलांना मागणीनुसार शस्त्र बाळगण्याचा परवाना देखील सहज उपलब्ध झाला पाहिजे. तसेच मुलींमध्ये सुद्धा याबद्दलची जाणीव जागृती होण्यासाठी काम करणे खूपच गरजेचे आहे.

मुलींना तातडीने कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षण पुरवले गेले पाहिजे. केवळ पोलीस संरक्षण नवे तर तपासणी यंत्रणा ठराविक वेळेत तपास करून न्यायालयांनी वेळेत निर्णय प्रक्रिया राबवून त्यांना न्याय देखील दिला पाहिजे.

रेंगाळत चाललेले खटले म्हणजे उशिरा मिळणारा न्याय हा न मिळालेल्या न्याय सारखा देखील आहे. मुलींसाठी फक्त महिला पोलिसांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत तपास केला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी फक्त महिला नायधीश असलेली फास्टट्रॅक न्यायालय देखील असली पाहिजे.

मुलींमध्ये एक प्रकारे नेहमी अशी भावना असते की आपण दुर्बल आहोत. मुलींनी भावना आणि मी जुगारून दिली पाहिजे. आपण नेहमी सरला आहोत आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी स्वतः तयार आहोत अशा आत्मविश्वासाने देखील समाजामध्ये वावरले पाहिजे.

अन्यायकारक रूढी आणि परंपरा यांना जुगारून दिले पाहिजे. या परंपरा आणि रुढीयांच्या चोपडामध्ये अडकवणारे आपले कुटुंबीय असले तरी त्यांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे.

आणि समजावून सांगितले तरी जरी ऐकत नसतील तर कुटुंबापासून एक वेळ आली तर सक्षमतेने बाजूला होऊन आपला आपल्या जीवनाचा संघर्ष देखील सुरू ठेवला पाहिजे.

मुलींना शैक्षणिक दृष्ट्या शक्तीवान बनवण्यासाठी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. किंवा शासकीय संस्थांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण खाजगी क्षेत्रामध्ये देखील शिक्षण संस्थांमध्ये मोफत शिक्षण मिळाले पाहिजे.

मुलींचे सुरक्षितेसाठी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वार्डामध्ये मुलींच्या संरक्षणासाठी पथक व कार्यरत ठेवले पाहिजे. कुठली स्त्री जेव्हा अडचणीत असेल त्यावेळी हे पथक वेगाने जाऊन त्या ठिकाणी त्या मुलीचे स्त्रीचे संरक्षण करू शकले पाहिजे. जागा शोधून सुरक्षारक्षक नेमले पाहिजेत.

कुटुंबावर शिक्षणाचा नेहमी आर्थिक बाहेर पडत असल्याने बऱ्याच वेळेस शिक्षण मध्ये सोडावे लागते ही एक खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.

गोष्ट केवळ योजना बनवतात मुलींना अधिक साक्षरता प्रदान केली पाहिजे. मुली आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र यासाठी भरपूर तसेच भरीव तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली गेली पाहिजे.

शासनाने अनेक कायदे करून मुलींसाठी बरेच काम केले पाहिजे. परंतु त्यासाठी अंमलबजावणी कशाप्रकारे होते यावर देखील शासनाने लक्ष दिले पाहिजे तातडीचे तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन केले गेले पाहिजे.

बालविवाह महिलांचे सक्षमीकरण करणे खूपच गरजेचे आहे. महिलांवर होणाऱ्या अन्याय मुळे आंदोलन करावे लागते. संपूर्णपणे स्वावलंबी होण्यासाठी देशातील प्रत्येक महिलांनी जनजागृती केली पाहिजे.

तरच महिला सक्षमीकरण योग्य मार्गाने होईल. आता मित्रांनो वेळ आली आहे की महिला स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे देऊ शकतात.

आणि त्यांना कोणापासूनही घाबरण्याची गरज देखील नाही. महिलांच्या विचारांचा आदर करणे ही एक कुटुंबाची आणि सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक माणसाची सकारात्मक विचारसरणीची स्त्रीच्या उन्नती सोबत नव्या दृष्टिकोनाने देखील परिपूर्ण समाज घडवू शकेल.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला मुलींची सुरक्षा व सशक्तिकरण याबद्दल दिलेला निबंध नक्कीच आवडलेला असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेला निबंध कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणताही निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो मुलींची सुरक्षा व सशक्तिकरण याबद्दल दिलेला मराठी निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending